('आश्चर्य' दर्शविण्याचे मार्ग:)
1. No way!
(नक्कीच नाही!, खरंच वाटत नाही!)
E. g. No way! Are you really going to China?
(उदा: खरंच वाटत नाही! तू खरोखरंच चीनला जात आहेस का?)
2. Is that a fact!
(हे खरं आहे का!)
E. g. I heard that you did Bungee jumping? Is that a fact!?
(उदा: तू बंगी जम्पिंग केलेस असे मी ऐकले? हे खरं आहे का!?)
3. Heavens above!
(सौम्य संताप आणि थोडे आश्चर्य दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो. )
E. g.
"I'm bored, " said Raj.
"Heavens above, " said his mother. "It's only the first week of the school holidays. Go outside and play. "
(उदा: राज म्हणाला, "मी कंटाळलो आहे"
"खरंच होय, बरा लगेच कंटाळलास"
शाळेच्या सुट्ट्यांचा तर हा पहिलाच आठवडा आहे. जा बाहेर जा आणि खेळ. " त्याची आई म्हणाली. )
4. No kidding!
(चेष्टा करत नाही!)
E. g. That movie got 5 stars! No kidding!
(उदा: मी चेष्टा करत नाही, त्या चित्रपटाला खरंच 5 स्टार्स मिळाले!)
5. Who would have thought?
(कोणी असा विचार तरी केला असेल का?)
E. g.
Ajay: Ali just quit his job and went to Africa.
Dev: Who would have thought he could do such a thing?
(उदा:
अजय: अलीने आत्ताच काही काळापूर्वी नोकरी सोडली आणि तो आफ्रिकेला गेला.
देव: कोणी असा विचार तरी केला असेल का, कि तो असे काही करेल?)
6. You would not believe!
(तुझा विश्वास बसणार नाही!)
E. g. You would not believe what just happened!
(उदा: आत्ता काय घडले यावर तुझा विश्वास बसणार नाही!)
7. For real?
(खरंच का?)
E. g.
Dev: She is just 9 years old and she plays guitar!
Ali: Is she for real?
(उदा:
देव: ती फक्त 9 वर्षांची आहे आणि ती गिटार वाजवते.
अली: खरंच ती इतकी लहान आहे का?)
Doubts on this article