Candidate: Sir, I was born and brought up in Chandigarh. I completed my bachelor's degree in commerce from Delhi University. I am a loyal and diligent professional with keen interest in sales and marketing. (सर मी चंदीगडमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. मी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. मी निष्ठावंत आणि कष्टाळू आहे आणि विक्री आणि विपणन क्षेत्र माझ्या आवडीचे आहे. )
(TIP: You do not need to tell your name again while replying to this question) (या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्हाला तुमचे नाव पुन्हा सांगण्याची गरज नाही. )
Interviewer: Do you have any prior experience in sales? (आपल्याला आधीपासूनच विक्री क्षेत्रातील काही अनुभव आहे का?)
Candidate: Yes, sir. I have two years of experience in sales. I have worked with two leading retail stores in the sales department. (हो सर, मला विक्री क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव आहे, मी विक्री विभागात दोन मुख्य रिटेल स्टोअर्ससोबत काम केलेले आहे. )
Interviewer: Tell me a bit about your last job profile. (मला आपल्या मागील नोकरीबाबत काहीतरी सांगा. )
Candidate: Sure. I was working with Big Bazaar, and I was responsible for sales and customer support at one of their outlets. I primarily looked after the beauty and wellness section at Big Bazaar. My role involved making the customers aware of our products, responding to their queries, helping them in finding the right products, and also grievance handling. (नक्कीच! मी बिग बाजार मध्ये कार्यरत होतो आणि त्यांच्या एका दुकानामध्ये मी विक्री आणि ग्राहक सेवा विभागाचा कार्यभार सांभाळत होतो. मी मुख्यतः Beauty and Wellness विभागाचे कार्य पाहत होतो. ग्राहकांना उत्पादनांबाबत माहिती देणे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, योग्य उत्पादन शोधण्यासाठी त्यांची मदत करणे आणि त्यांच्या समस्यांचे समाधान करणे. )
Doubts on this article