(नमस्कार, काय करत आहात?)
Raj: Hey, nothing much. You tell me?
(नमस्कार, काही विशेष नाही. तुम्ही सांगा?)
Neha: Same old. I was getting really bored, so thought of pinging you.
(तेच नेहमीचेच. मला खरंच खूप कंटाळा आला होता, म्हणून म्हणलं तुम्हाला मेसेज करूया. )
Raj: Same here. What is your plan for the evening?
(मला पण असेच वाटत होते. आज संध्याकाळचा काय प्लॅन आहे?)
Neha: I haven't made any plans yet, do you want to go for a movie together?
(मी अजून काही प्लॅन ठरवलेला नाही, तुला माझ्यासोबत चित्रपट पाहायला यायला आवडेल का?)
Raj: I don't mind. Hold on, let me call you, and we could select a good movie to go for.
(माझी काही हरकत नाही. थांब, मी तुला फोन करतो, आणि मग आपण एक चांगला चित्रपट निवडू. )
Neha: Sure!
(नक्कीच!)
2. Dev: Hey, I hope I am not disturbing you.
(नमस्कार, आशा करतो कि मी तुझ्या कामात व्यत्यय आणत नाही. )
Sita: Not at all! Tell me?
(अजिबात नाही! बोल?)
Dev: I needed some help with a project. Is this a good time to discuss it?
(मला एका प्रोजेक्टसाठी थोडी मदत हवी आहे. चर्चा करण्यासाठी ही वेळ योग्य आहे का?)
Sita: Would you mind if I ping you in about 10 minutes? I was just getting done with some work.
(तुझी काही हरकत नसेल तर मी 10 मिनिटांनी तुझ्याशी बोलले तर चालेल का? मी थोडेसे राहिलेले काम तोवर पूर्ण करेन. )
Dev: Sure. I will wait for you to ping me.
(नक्कीच. मी तुझ्या मेसेजची वाट पाहतो. )
3. Ram: Hello, long time! How have you been?
(हॅलो, खूप दिवस झाले! कसा आहेस तू?)
Shyam: Hey! Good to hear from you. I have been good. What about you?
(नमस्कार, तुझ्याशी बोलून छान वाटतंय. मी ठीक आहे. तू सांग?)
Ram: I've been good as well. What are you up to these days?
(मी सुद्धा ठीक आहे. तुझं आजकाल काय सुरु आहे?)
Shyam: Nothing new. Still working with Reliance.
(काही विशेष नाही. आत्तासुद्धा रिलायन्समध्येच काम करत आहे. )
Ram: Well, that's great. We should plan to catch up soon.
(ही तर चांगली गोष्ट आहे. आपण लवकरच भेटण्याचा प्लॅन केला पाहिजे. )
Shyam: Absolutely! Let us meet this weekend.
(नक्कीच! या शनिवार - रविवारी ठरवून भेटूया. )
4. Ravi: Hey, what's up?
(नमस्कार, काय चालू आहे?)
Ajay: Hi, I am a little busy right now. Would you mind if I ping you in an hour? Really sorry, but I am working on something important.
(नमस्कार, क्षमा करा पण मी आत्ता थोडासा व्यस्त आहे. तुझी काही हरकत नसेल तर मी तुला 1 तासाने मेसेज करू का?)
Ravi: That is completely fine. Sorry for disturbing you.
(हे ठीक राहील. तुमच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व. )
Ajay: No issues.
(काही समस्या नाही. )
5. Ajay: Hey, where have you been? I have been pinging you since two days.
(नमस्कार, तू कुठे गायब होतास? मी तुला दोन दिवसांपासून मेसेज करतोय. )
Raj: I am sorry. I was not in town.
(माफ कर. मी बाहेरगावी गेलो होतो. )
Ajay: Oh, where were you?
(ओह, कुठे गेला होतास?)
Raj: I was in Mumbai for some work.
(मी काही कामानिमित्त मुंबईत गेलो होतो. )
Ajay: Oh, well, now that you are back, let us catch up some time?
(ठीक आहे, बरं आता परत आला आहेस तर मग कधी भेटायचे?)
Raj: Sure, how about next week? Come over for lunch.
(नक्की, पुढच्या आठवड्यात भेटायचे? जेवायलाच ये. )
Ajay: Sure!
(नक्कीच!)
Doubts on this article