13 Compliments on a photo:
(छायाचित्राचे कौतुक करण्यासाठीची 13 वाक्ये:)
1. That's a stunning picture! You look so beautiful in it.
(ते एक अत्यंत आकर्षक छायाचित्र आहे! तू त्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहेस. )
2. You look so handsome in that picture! And the backdrop is equally amazing too.
(त्या छायाचित्रात तू खूप देखणा दिसतो/देखणी दिसत आहेस! आणि पार्श्वभूमीदेखील तितकीच सुरेख आहे. )
3. Your smile is contagious! What an adorable picture!
(तुझे हास्य इतरांच्या चेहऱ्यावर हास्य उमटविणारे आहे! हे छायाचित्र खरोखर खूप मोहक आहे!)
4. What a refreshing picture! You both look so cute in it.
(ते एक उत्साहवर्धक छायाचित्र आहे! तुम्ही दोघेही त्यात खूप सुंदर दिसत आहात. )
5. Your eyes are breathtaking! Nice picture!
(तुझे डोळे चित्तवेधक आहेत! सुंदर छायाचित्र!)
6. I totally love the picture and love what you are wearing.
(मला छायाचित्र आणि तुझा पोशाख फारच आवडला. )
7. You picture looks amazing! Looks like you're really enjoying your vacation.
(तुझा फोटो खूप छान दिसत आहे! असे वाटतेय कि, तुम्ही सुट्टीची धम्माल करत मज्जा लुटत आहात. )
8. Your picture is vibrant! Greece is indeed a beautiful place.
(तुझे छायाचित्र चैतन्यमय आहे! ग्रीस हे एक सुंदर ठिकाण आहे यात शंका नाही. )
9. That jacket looks great on you!
(ते जाकीट तुझ्यावर खूप सुरेख दिसते!)
10. Your family looks adorable in the picture! What an amazing picture! You should get it framed.
(त्या छायाचित्रात तुमचे कुटुंब मोहक दिसत आहे! खूपच छान फोटो! तुम्ही तो फ्रेम करून लावला पाहिजे. )
11. It's been so long I haven't seen you! You look so beautiful in the picture. We must catch up soon!
(खूप कालावधीपासून आपण भेटलेलो नाही. त्या छायाचित्रात तू खूप सुंदर दिसत आहेस. आपण लवकरच भेटायला हवे!)
12. This is a fabulous click. You are so photogenic.
(हे एक अविश्वसनीय छायाचित्र आहे. तू छायाचित्रणास अतिशय अनुरूप आहेस. )
13. The black dress looks really elegant on you. You carry it off so well! Gorgeous photo!
(काळ्या रंगाचा ड्रेस तुझ्यावर खरंच शोभून दिसतो. तू तो चांगल्या पद्धतीने मिरवतेस! सुरेख छायाचित्र!)